X-APMC - मंचर बाजार समितीत कांद्याला विक्रमी दर

*मंचर: मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे बाजारभावात वाढ झालेली आहे. रविवारी दहा किलो कांदा २२१ रुपये या भावाने विकला गेला

 · 1 min read

*मंचर: मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे बाजारभावात  वाढ झालेली आहे. रविवारी दहा किलो कांदा २२१ रुपये या भावाने विकला गेला आहे.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला रविवारी १० किलोला २२१ रुपये असा बाजारभाव मिळाला. १० हजार ८९५ पिशवी कांद्याची आवक होवून चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला २२१ रुपये या भावाने विकला गेला आहे.अशी माहिती बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी दिली.

कांद्याचे प्रति दहा किलोचे दर पुढीलप्रमाणे:

सुपर लॉट १ नंबर  गोळा कांदा रुपये २०० ते २२१ रुपये,

सुपर गोळे कांदे १ नंबर रुपये १८० ते १९० रुपये,

सुपर मिडीयम २ नंबर कांद्यास १३० ते १५० रुपये,

गोल्टी व गोल्टा कांद्यास १०० ते १३५  रुपये

बदला कांदे / चिंगळी कांद्यास ४० ते ९०

असा बाजारभाव मिळाला. अशी माहिती बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे  यांनी दिली.                              

फोटोखाली: मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची रविवारी लिलाव पद्धतीने विक्री झाली.*


No comments yet.

एक टिप्पणी जोडा
Ctrl + टिप्पणी जोडण्यासाठी प्रविष्ट करा