X-APMC - तरकारी व फळ भाज्यांच्या बाजारभावात वाढ
मंचर -तरकारी व फळ भाज्यांच्या बाजारभावात वाढ घेवडा, पापडी, मिरची व जांभूळ यांच्या बाजारभावात वाढ झाली असे सभापती श्री.निलेश थोरात यांनी सांगितले.
मंचर -तरकारी व फळ भाज्यांच्या बाजारभावात वाढ घेवडा, पापडी, मिरची व जांभूळ यांच्या बाजारभावात वाढ झाली असे सभापती श्री.निलेश थोरात यांनी सांगितले. उन्हाळ्याच्या सुट्टी संपल्या व शाळा कॉलेज चालू झाल्यामुळे रोजच्या जेवणाच्या डब्यासाठी लागणारी भाजीची मागणी वाढली त्यामुळे तरकारी व फळ भाजीच्या बाजारभावात वाढ झालेली दिसून येत आहे . कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे आजदिनांक-07/06/2026 रोजी तरकारी शेतमालाची एकूण *8793*डाग इतकी आवक झाली. मंचर बाजार समितीमध्ये तरकारी व फळभाज्या या शेतमालाला दहा किलोला खालील प्रमाणे बाजारभाव मिळाला कंसात मालाची आवक दर्शविलेली आहे. आले-(37)100-800, काकडी (593)30-400, कारलं(262)150-450, कैरी-(272)20-400, कोबी (437)50-180, गवार(999)50-600, गाजर(5)250, घेवडा (4)350-900, घोसाळी (6)120-250, चवळी (146)60-441, जांभूळ (5)400-1000, टोमॅटो (116)85-500, ढोबळी मिरची(135)50-550, तोंडली(138)100-400, दुधी भोपळा(205)40-250, दोडका(96)100-550, पापडी (2)700, फरशी(1)400, फ्लॉवर (2887)20-221, बीट (877)30-290, भुईमूग शेंगा (237)250-611, भेंडी(288)50-500, मका(173)50-150, मिरची(424)200-700, लिंबू(27)450-700, वांगी (229)30-400, शेवगा (79)200-600. वरील प्रमाणे तरकारी व फळभाजी या शेतमालाला चांगला बाजार भाव मिळाला असे बाजार समितीचे उपसभापती श्री. सचिन पानसरे यांनी सांगितले.
No comments yet. Login to start a new discussion Start a new discussion