X-APMC - मंचर -उन्हाळ्यामुळे तरकारी व फळभाज्यांच्या अवकेत घट, बाजारभावात किंचित वाढ
उन्हाळ्यामुळे तरकारी व फळभाज्यांच्या अवकेत घट, बाजारभावात किंचित वाढ
कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे आज दिनांक -10/05/2026 रोजी तरकारी शेतमालाची एकूण 7522डाग इतकी आवक झाली व शेतमालाला चांगला बाजार भाव मिळाला अशी माहिती बाजार समितीचे सभापती श्री.निलेश( स्वामी) थोरात यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारची तरकारी आंबेगाव, खेड, जुन्नर, पारनेर व शिरूर या भागातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी तरकारी या शेतमालाची आवक विक्रीसाठी घेऊन येत असतात. तरकारी शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतमालाचे वजन,बाजार भाव व एकूण रक्कम याचा एसएमएस(SMS) मोबाईल ॲप द्वारे त्यांच्या मोबाईलवर लगेच कळतो.
मंचर बाजार समितीमध्ये तरकारी या शेतमालाला दहा किलोला खालील प्रमाणे बाजारभाव मिळाला कंसात मालाची आवक दर्शविलेली आहे.
फरशी(8)650-1200,
लिंबू(4)200-1100,
गवार(416)50-650,
घेवडा (28)200-580,
मिरची(325)70-500,
अघोरा(6)20-60,
आले(30)100-500,
काकडी(945)20-301,
कारलं (204)20-350,
कैरी(462)20-400,
कोबी(597)30-80,
गाजर(31)70-150,
घोसाळी(1)120)
चवळी(62)40-300,
टोमॅटो (10)100-500,
ढोबळी मिरची (167)50-410,
तोंडली(63)60-425,
दुधी भोपळा (194)20-150,
दोडका(82)30-300,
पापडी(1)420,
फ्लावर(2520)10-100,
बटाटा(2)70,
बीट(718)30-300,
भेंडी(170)50-380,
मका(72)40-100,
लसुन (2)1100,
वांगी (168)35-300,
वालवड(3)300-460,
शेवगा(26)100-450.
वरील प्रमाणे तरकारी शेतमालाला चांगला बाजार भाव मिळाला असे बाजार समितीचे उपसभापती श्री. सचिन पानसरे यांनी सांगितले.
No comments yet. Login to start a new discussion Start a new discussion