X-APMC - मंचर बाजार समितीत फ्लावरची विक्रमी आवक एकूण डाग ४६२०
मंचर बाजार समितीत फ्लावरची विक्रमी आवक एकूण डाग ४६२०
मंचर बाजार समितीत फ्लावरची विक्रमी आवक एकूण डाग ४६२०. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी व फळ बाजारात तरकारीचे बाजारभाव उन्हाळीच्या तीव्रतेने तसेच पाऊस लांबणीवर पडल्यामुळे वाढले आहेत असे सभापती श्री.निलेश थोरात यांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर येथे आज दिनांक-२१/०६/२०२६ रोजी तरकारी शेतमालाची एकूण *१२२९२*डाग इतकी आवक झाली. मंचर बाजार समितीमध्ये तरकारी व फळभाज्या या शेतमालाला दहा किलोला खालील प्रमाणे बाजारभाव मिळाला कंसात मालाची आवक दर्शविलेली आहे. आले-(५३)२००-१०००, काकडी (९८४)२०-३६५, कारलं(३०३)२००-५००, कैरी-(६०)२०-३७०, कोबी (४६३)७०-१९०, गवार(१८८५)५०-६००, घेवडा (५२)३००-१०६०, घोसाळी (९)१००-२२०, चवळी (१७२)५०-४२१, टोमॅटो (१२२)१५०-६४०, ढोबळी मिरची(२२०)७०-५५०, तोंडली(६७)१३०-४५१, दुधी भोपळा(२१४)२०-२७०, दोडका(९८)५०-६००, पापडी (१०)५००-७५०, फरशी(९)४००-९००, फ्लॉवर (४६२०)१०-२५०, बीट (९०७)४०-३०५, भुईमूग शेंगा (३२५)३००-६५०, भेंडी(३४०)२०-४५०, मका(४५७)३०-१५०, मिरची(४८०)८०-६००, लिंबू(५)३००-५००, वांगी (२५३)४०-३५१, शेवगा (४४)२००-७००. वरील प्रमाणे तरकारी व फळभाजी या शेतमालाला चांगला बाजार भाव मिळाला असे बाजार समितीचे उपसभापती श्री. सचिन पानसरे यांनी सांगितले.
No comments yet. Login to start a new discussion Start a new discussion