मंचर कृपी उत्पन्न बाजार समिती

बाजार समिती विषयी

कृषि उत्पन्न बाजारसमिती, मंचर

कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर ही महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ अंतर्गत स्थापन झालेली एक स्वायत्त संस्था आहे. शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी तसेच ग्राहक यांच्या हिताचे संरक्षण करून शेतीमालाच्या पारदर्शक, स्पर्धात्मक व न्याय्य बाजार व्यवस्थेची अंमलबजावणी करणे हे समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.


कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर ही पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाची बाजार समिती असून कांदा, बटाटा, भाजीपाला, फळे तसेच इतर कृषी उत्पन्नाची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री येथे केली जाते. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ, स्पर्धात्मक दर आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समिती सातत्याने कार्यरत आहे.


समितीच्या कार्यक्षेत्रात मुख्य बाजार यार्ड तसेच लोणी उपबाजार आणि तळेघर उपबाजार कार्यरत असून, शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातच बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे कार्य केले जाते


2026 IGNYX Systems Private Limited सर्व हक्क राखीव.
Designed & Developed by IGNYX Systems Private Limited